मतचोरीविरोधी चळवळीला स्थानिकांचा पाठींबा उदय जाधवांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक उतरले रत्यावर
प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत काढलेल्या सत्याचा मोर्चाला वसई-विरारमधूनही जीरदार प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे – उबाठा) चे विरार शहरप्रमुख उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी स्थानिक पातळीवरही हा मोर्चा काढला. #वोट_चोर_गद्दी_छोड ही घोषणा देत शिवसैनिकांनी निवडणुक आयोगाच्या भ्रष्ट कारभारावर आणि मतदार याद्यांतील घोळावर कठोर टीका केली.
हा मोर्चा मुंबईतील राज्यस्तरीय मोर्च्याचा भाग असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास करून मुंबईत सहभाग दर्शविला, तर विरारमध्ये स्वतंत्र मोर्चा काढण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारावर प्रकाश टाकणे, बोगस मतदार याद्या शोधणे आणि ईव्हीएम च्या संशयास्पद वापरावर प्रश्न उपस्थित करणे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आला असून, मतचोरीला आळा घालणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे असे उदय जाधव यांनी सांगितले.
विरार शहरातील शिवसेना उबाठा च्या शाखा, युवा सेना आणि महिला सेनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला, मनसे कार्यकत्यांनीही रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करुन एकजूट दाखविली. मुंबईमध्ये झालेल्या मोर्चात मनसे, राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि शेकाप चे नेते उपस्थित होते. विरार रेल्वे स्टेशन ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला, यामध्ये सुमारे ५०० हून अधिक शिवसैनिक सहभागी झाले होते. निवडणूक आयोग बोगस, मतदाराचा हक्क लोळस सारख्या घोषणांनी शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला.
हा मोर्चा केवळ आंदोलन नाही, तर लोकशाहीचा सत्याग्रह आहे. मतदार याद्या शुध्द करा, नाहीतर जनता रस्त्यावर येईल. – उध्दव ठाकरे,
शिवसेना उबाठा – पक्षप्रमुखमहाराष्ट्र एकवटला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीप्रमाणे आता लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे. – राज ठाकरे,
मनसे – पक्षप्रमुख
या मोर्चाने देशाला दिशा मिळेल, मतदाराने स्वतःची यादी तपासावी. – शरद पवार, अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस
नालासोपारामधील मतदार यादीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस
महाविकास आघाडीचा निचडणुक आयोगाच्या गलथन कारभाराविरोधात सत्याचा मोर्चा निघाला असतानाच नालासोपारामधून मातदार यादीतील गंभीर त्रुट पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. नालासोपारा विधानसभा मतदार संघातील मतदार रादीत तब्बल ४९ मतदारांच्या नावासमोर पती किंवा वडिलांच्या रकान्यात एकाच व्यक्तीचे नाव (प्रवीण प्रमोद देवधर) नोंदवले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मतदार यादीची विश्वासार्हता आणि निवडणुक आयोगाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यापूर्वीही नालासोपारा येथील सुषमा गुप्ता या मतदार महिलेचे नाव मतदार यादीत सहा वेळा नोंदविले गेले होते.









