पोलीसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणान्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची राज्यस्तरीय संघर्ष बैठक रविवार दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे संपन्न झाली.
यावेळी संघटनेच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली तसेच संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना हक्काचे घर, मोफत आरोग्य सुविधा आणि १०/२०/३० वा लाभ मिळावा. सेवेत असणाऱ्या पोलीस पाल्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आरक्षण मिळावे. जेल पोलीस बॉईज यांना पोलीस पाल्य मिळावे. अधिकारी यांच्या मुलांना अनुकंप नोकरी आणि पोलीस मिळावे. तीन अपत्यांना अनुकंप नोकरी मिळावी. डीजी लोन बाबत सविस्तर माहिती. स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अमलदाराच्या मुलाला अनुकंपा नोकरी मिळावी असे अनेक मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून राज्याच्या पोलीस विभागाये पालक आणि काही अधिकारी उपस्थित होते. सदर बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालघर जिल्हयातील बहुसंख्य संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते अशी माहिती पालघर जिल्हा सचिव रोहित रामचंद्र सावंत यांनी दिली.








