Home ताज्या बातम्या विरार इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना मोबदला देण्यास सुरुवात

विरार इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना मोबदला देण्यास सुरुवात

30
0
विरार इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना मोबदला देण्यास सुरुवात

विरार पूर्व येथील विजयनगर मधिल ४ मजली रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या १७ जणांच्या वारसांना जवळपास ५० दिवसांनंतर शासकीय मदत निधी बाटपाला सुरुवात झाली आहे. हा निधी वसई तहसीलदार कार्यालयातून करण्यात येत आहे. पाहिल्या टप्प्यात ५-६ कुटुंबांना हा निधी मिळाला आहे तर उर्वरितांना १० दिवसांत निधी मिळणार आहे.
ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती, ज्यात १७ जणांचा मृत्यु झाला आणि ९ जण गंभीर जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ५ लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला होता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सदर घटनेनतंर विरार पोलीसांनी बांधकाम व्यावसायिक नितल साने आणि जागा मालकासह ५ जांवर गुन्हा दाखल केला, तसेच वविशमपा चे प्रभाग सी सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हें शाखा युनिट ३ तपास करीत आहे.

वसई विरार महानगरपालिकेने या घटनेनंतर धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण वेगवान केले ज्यामध्ये ५६३ पेक्षा जास्त इमारती जीर्ण अवस्थेत आढळल्या आहेत आणि १५० आस्त इमारतींना अतिधोकादायक घोषित केले आहे. आणि समूह पुनर्विकास योजनेला (कलटर डेव्हलेपमेंट) गती दिली आहे. नागरिक आणि राजकीय नेत्यांनी इमारतीच्या अनधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.