Home वसई - विरार डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्विझेबल्ड स्पर्धेत उज्ज्वल यश राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व...

डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्विझेबल्ड स्पर्धेत उज्ज्वल यश राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व !

89
0
डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्विझेबल्ड स्पर्धेत उज्ज्वल यश राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व !

विशेष मुलांसाठी कार्य करत असणाऱ्या डीसी स्पेशल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्विझेबल्ड स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवले असून, त्यांच्यातील दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. त्याबाबत माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी त्यांचा नुकताच गौरव केला आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी

क्विझेबल्ड स्पर्धेच्या ज्युनियर आयडी (Intellectual Disability) श्रेणीत भवेश कायकुते आणि अंश केळुसकर या दोन विद्याथ्यांनी विजेतेपद मिळवले. हे दोघे आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील क्विझेबल्ड स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते, ज्यात त्यांची बौद्धिक क्षमता आणि सामर्थ्य ओळखले जाते.

इतर श्रेणींमध्येही डीसी स्पेशल स्कूलचे विद्यार्थी

एचआय (Hearing Impairment) श्रेणी: आयुष पुरोहित आणि आयुष मिश्रा हे फायनलिस्ट ठरले.
ज्युनियर आयडी श्रेणी: तुषार भामरे आणि यथार्थ कदम हे फायनलपर्यंत पोहोचले.
सेमी फायनल्स : रिषभ पुरकायस्थ आणि प्रियांश कावा यांनी सेमी फायनल्सपर्यंत मजल मारली.

क्षितिज ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले की, डीसी स्पेशल स्कूलचे विद्यार्थी क्विझेबल्ड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचा अभिमान वाटला आहे! विजेत्या, फायनलिस्ट आणि सहभागी सर्व विद्याथ्यांचे हार्दिक अभिनंदन, तुमचे कष्ट आणि निश्चय खरोखरच प्रेरणादायी आहेत! हे यश वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यातील विशेष गरजा असलेल्या विद्याथ्यीसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे ठाकूर यांनी नमूद केले आहे.

या पोस्टला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले असून, कमेंट्‌समध्ये पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकत्यांनी विद्याथ्यांचे कौतुक केले आहे.

स्पर्धेचे महत्त्व :

क्विझेबल्ड ही स्पर्धा विशेष गरजा असलेल्या विद्याथ्यीसाठी एक व्यासपीठ आहे, ज्यात त्यांची बौद्धिक क्षमता चाचपडली जाते. या वर्षी महाराष्ट्र स्तरावर ही स्पर्धा आयोजित झाली असून, विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली. डीसी स्पेशल स्कूल, विरार येथील ही शाळा विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. शाळेच्या या यशामुळे विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात समावेशकता आणि प्रोत्साहनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हे यश डीसी स्पेशल स्कूलच्या विद्याथ्यांच्या मेहनतीचे आणि शाळेच्या समर्पित शिक्षकांच्या प्रयत्नांचे फळ आहे. यावेळी शाळेच्या संस्थापिका दिशा चंद्रगिरी आणि शिक्षक धर्मेश सावंत उपस्थित होते.