Home गुन्हे जगत वसईत बस चालकावर हल्लाः दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वसईत बस चालकावर हल्लाः दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

153
0
वसईत बस चालकावर हल्लाः दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वसई-विरार महानगरपालिकेच्या बस चालकावर दोन व्यक्तींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हि घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. फिर्यादी किरण भरत वर्तक (वय ४९, रा. वैष्णवी देवी बाजूला, वसई नाका) हे वसई-विरार महापालिकेच्या कंत्राटी बस चालक आहेत. त्या नालासोपारा ते कळंब मार्गावर बस चालवत असताना, राजोडी आणि बुध्दाजी स्टॉपदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने बसला हात दाखवला. मात्र, तेथे अधिकृत स्टॉप नसल्याने किरण यांनी पुढील स्टॉपवर बस थांबवली.

यावरून संतापलेल्या दोन व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन बसमध्ये घुसून किरण यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या कंडक्टर लक्ष्मण चंद्रकांत ठाकरे (वय ३३) यांनी मोबाइलवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि मोबाइल फोडला. घटनेनंतर किरण यांनी ११२ डायल करून पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने आरोपींची ओळख पराग विष्णू निजाई आणि अंकुर विष्णू निजाई (रा. जनार्दन पाडा, कळंब, वसई) अशी झाली.

या हल्ल्यात किरण यांना सरकारी कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करण्यात आला. गुन्हा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, १२१(२), ३५१ (२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.