Home ताज्या बातम्या महापालिका मतदार यादीत प्रचंड घोळ;

महापालिका मतदार यादीत प्रचंड घोळ;

69
0
महापालिका मतदार यादीत प्रचंड घोळ;

मुंबईत ११ लाख दुबार नावे निवडणूक आयोगाची मुदतवाढ


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सावत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि दुबार नावे आढळून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत २० दिवसांनी वाढवून आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. याआधी अंतिम मतदारयादी ५ डिसेंबरला प्रसिद्ध होणार होती; ती आता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलली गेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे :

  • हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीखः ३ डिसेंबर २०२५
  • हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम यादी प्रमाणित करणे १० डिसेंबर २०२५
  • मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२५
  • मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणेः २२ डिसेंबर २०२५

या निर्णयामागचे मुख्य कारण म्हणजे मुंबई महापालिका मतदारयादीतील प्रचंड घोळ, मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली असून, ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे एकापेक्षा जास्त वेळा नोंदवली गेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाच व्यक्तीचे नाव १०३ वेळा आढळले आहे ! यामुळे मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी केलेला “दुबार मतदारांधा डाय” असा दावा पूर्णपणे खरा ठरला आहे.

मुंबईसह इतर महापालिकांनीही मतदारयादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले होते. त्यामुळे आयोगाने नव्याने प्रारूप यादी तयार करून हरकती घेण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. या मुदतवाढीमुळे राजकीय पक्षांना आणि नागरिकांना आपले नाव तपासण्याची, दुबार नावे काढण्याची तसेच नवीन नावे समाविष्ट करण्याची पुरेशी संधी मिळणार आहे.

मतदारयादी स्वच्छ नसेल तर निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. आता ३ डिसेंबरपर्यंत नागरिकांनी आपली नावे तपासावीत आणि आवश्यक त्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.