Home गुन्हे जगत स्कूल बस मालकाचे धक्कादायक कृत्य! अपहरणाच्या धमकीने ४ लाख खंडणी मागितले, काशिमीरा...

स्कूल बस मालकाचे धक्कादायक कृत्य! अपहरणाच्या धमकीने ४ लाख खंडणी मागितले, काशिमीरा पोलिसांनी ठोकल्या बी बेड्या!

61
0
स्कूल बस मालकाचे धक्कादायक कृत्य! अपहरणाच्या धमकीने ४ लाख खंडणी मागितले, काशिमीरा पोलिसांनी ठोकल्या बी बेड्या!

मीरारोडमध्ये स्कूल बस चालवणाऱ्या मालकाने शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन त्याच्या आईकडून ४ लाख रुपये खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काशिमीरा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आरोपीचे नाव सदानंद बाबुराव पत्री (वय ३७, रा. महाजनवाडी, मीरारोड). हा सेंट जेरॉम आणि मदर मेरी शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी व्हॅनने ने-आण करतो. सुरक्षेच्या कारणास्तव त्याने पालकांकडून मुलांचे फोटो आणि मोबाईल नंबर त्याच्याकडे गोळा करून ठेवले होते. त्याच्याकडे ३ व्हॅन आहेत त्यातील तो स्वतः एक चालवतो, एक भाचा आणि एका व्हॅनवर ड्रायव्हर ठेवला आहे. तसेच त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान देखील आहे. बिगारीचा धंदा करणाऱ्या एका कामगाराचा त्याने सिमकार्ड खराब आहे असे सांगून त्याच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून स्वतःकडे ठेवले आणि त्याच सिमकार्डचा गैरवापर करून तो खंडणीसाठी धमकी देत असल्याचे समजले.

२४ ऑक्टोबर रोजी सेंट जेरॉम शाळेतील ९वीच्या १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या आईला “तुझ्या मुलाचे अपहरण करू, ४ लाख दे!” व्हॉट्सअपवर धमकी आली. पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच तपासाची चक्रे फिरवली. धमकी देताना आरोपी पत्री याने व्हॉट्सअपवर मुलाचा फोटो पाठवला. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती जाणून घेतली असता सदर फोटो स्कूल बस चालकाला दिल्याचे समजले. पोलिसांनी लागलीच पत्री याला ताब्यात घेतले आणि आपला पॉलिसी खाक्या दाखविला. लगेच तो पोपटासारखा बोलू लागला आणि आपला गुन्हा कबूल केला .

पोलीस तपासात त्याने इतरही पालकांना धमकी दिल्याचे समजले. याबाबत काशिमीरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश किणी अधिक तपास करीत आहे.

सदर प्रकारचा छडा लावण्यासाठी सहाय्यक आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेश किणी, शिवाजी खाडे याच्यासह राहुल सोनकांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल पांडागळे, मुकेश कांबळे, जयप्रकाश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली