Home वसई - विरार वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वन-वे धोरण

वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वन-वे धोरण

29
0
वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वन-वे धोरण

वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर एक दिशा मार्गिका (वन-वे) धोरण राबविले जाणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

काशिमीरा वाहतूक विभाग (परिमंडळ १) आणि विरार वाहतूक विभाग (परिमंडळ ३) यांच्या संयुक्त देखरेखीखाली हे धोरण लागू होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१ आणि मोटार वाहन कायदा कलम १७९ अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

विरार शहरातून अंतर्गत वाहतुकीमध्ये बदल
प्रवेश मार्ग बंद:
महानगरपालिका कार्यालयासमोरुन, वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे मजेठिया नाका ते टोटाळे तलाव (वाचनालयाकडे जाणारा मार्ग) ८ नोव्हेंबरपर्यत पुर्णपणे बंद
पर्यायी मार्ग: मजेठिया नाका / सबये नाका येथून येणारी वाहने मच्छी मार्केट, बी. के. वर्तक चौक मार्गे बाहेर पडतील टोटळे तलाव वाचनालय येथून येणारी वाहने मजेठिया नाका (बस स्टैंड समोरुन) मार्गे बाहेर पडतील.

या काळावधीत नागरिकांनी संयम बाळगावा, नवीन मार्गिकांचे पालन करावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. यामुळे दीर्घकाळात शहरातील चाहतूक व्यवस्था सुधारेल, असे आवाहन वाहतूक पोलीसांचे केले आहे.