माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
प्रतिनिधी : वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात स्प्लेंडर आणि बुलेट मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीस मोठ्या शिफारतीने अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी ७स्प्लेंडर आणि १ बुलेट मोटारसायकल जप्त केल्या असून, एकूण ७ गुन्ह्यांचा छडा लागला आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत ५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणिकपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. तक्रारदार विमलेश गोपीचंद तिवारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुरबाड (ठाणे) आणि दादर (मुंबई) पर्यंत सुमारे ६०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास करून पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता आरोपी अविराज सुनिल गायकवाड (वय ३१, रा. उंब्रज, ता. जुन्नर, जि. पुणे) याला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले.08
चौकशीत त्याने चोरीच्या वाहनांची माहिती दिली, ज्यामुळे पोलिसांनी सर्व वाहने जप्त केली. या कारवाईमुळे माणिकपुर, नालासोपारा, विरार आणि बोलिंज पोलिस ठाण्यांतील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हि कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले–श्रींगी (पोलिस उपायुक्त परिमंडळ २), नवनाथ घोगरे (सहाय्यक पोलीस आयुक्त वसई), हरिलाल जाधव (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), दुर्गा चौधरी (पोलिस निरीक्षक -गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलिस हवालदार शामेश चंदनशिवे, रामदास भुजबळ, पोलिस अमलदार मंगेश जगताप, गोविंद लवटे, आनंदा गाडदे, प्रवीण कांदे, व पोलीस उपयुक्त कार्यालय परिमंडळ २ चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलिस अमलदार अमोल बेर्डे आदींनी मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास सुरू ठेवला असून, वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतर्कता वाढवली आहे.









