Home ताज्या बातम्या वसई-विरार महानगरपालिका निवडणूक २०२५

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक २०२५

79
0
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक २०२५

आरक्षण सोडत जाहीर, ५८ जागा महिलांसाठी राखीव

पाच वर्षाच्या प्रलंबित वाटेल अखेर मुहूर्त मिळाला असून, वसई-विरार शहर महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी पार पडली. प्रभारी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या सोडतीत २९ प्रभागातील ११५ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यात ५८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्वसाधारण पुरुष उमेदवारांमध्ये काही प्रमाणात निराशा निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

एकूण प्रभाग आणि जागा : २९ प्रभाग (२८ मध्ये प्रत्येकी ४ जागा, १ मध्ये ३ जागा) एकूण ११५ सदस्य.

आरक्षण वितरण

अनुसूचित जाती (महिला): प्रभाग ११अ, १४अ, १९ (३ जागा),

अनुसूचित जमाती (महिला): प्रभाग १९८, २५अ, २७ (३ जागा),

ओबीसी (महिला): प्रभाग १६, २३१, ४१, ६३, ७, ८, ९, १२, १३, १५, १७३, २०क, २१३, २३अ, २६अ, २९७ (१६ जागा),

सर्वसाधारण (महिला): प्रभाग १क, २ब, ३ब, ३क, ४ब, ५ब, ५क, ६ब, ७ब, ८ब, ९ब, १०ब, १०क, ११क, १२क, १३ब, १४क, १५ब, १६ब, १६क, १७ब, १८ब, १८क, २०ड, २१क, २२ब , २२क, २३क, २४ब, २४क, २५क, २६ब, २७क, २८ब, २८क, २९क (३६ जागा).

महिलांसाठी एकूण ५८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पुरुष उमेदवारांना फटका बसला आहे.

सोडत जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्यींच्या हस्ते काढण्यात आली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूब, केबल टीव्ही आणि मोव्या स्क्रीनवर करण्यात आले, ज्यामुळे पारदर्शकता राखली गेली. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी प्रास्ताविक आणि सहायक आयुक्त (निवडणूक) विश्वनाथ तळेकर यांनी प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले. यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप-आयुक्त स्वाती देशपांडे, आअजित गुठे, अर्थता दिवे, हर्षला राणे, प्र. शहर अभियंता प्रदीप पाचंगे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आणि नागरिक

मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण प्रारूप १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. १७ ते २४ नोव्हेंबर पर्यंत हरकती सूवना सादर करता येतील. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्यांवर आधारित प्रभाग रचना

कायम ठेवण्यात आली आहे. राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया

राजकीय वर्तुळात आनंद आणि निरासेची भावना एकत्र आहे. महिलांसाठी जागा वाढल्याने महिला उमेदवार उत्साही असले तरी, सर्वसाधारण पुरुषांना मोठा धक्का बसला आहे.