Home ताज्या बातम्या विरारमधील तरणतलाव मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

विरारमधील तरणतलाव मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

29
0
विरारमधील तरणतलाव मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

विरार पश्चिमेतील यशवंत नगर भागातील अमेय क्लासिक क्लब येथील तरण तलावात मंगळवार दि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास साडेतीन वर्षांचा ध्रुव चंदनसिंह विष्ट हा चिमुकला बुडून मृत्यू पावला या दुर्घटनेनंतर क्लब मधील दोन प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोळींज पोलीस ठाणेमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) आणि २५ नुसार तिघानाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून शहरातील तरणतलावांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

याबाबतची माहिती अशी की, ध्रुव हा आईसोबत क्लबच्या तरणतलावात खेळण्यासाठी गेला होता तलावातील पाण्याची खोली सुमारे ३ फूट असून, लहान मुलांसाठी हा भाग असुरक्षित ठरला. आईने क्षणभर दुसरीकडे पाहिले असता ध्रुव पाण्यात बुडाला. क्लबमधील प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी वेळीच लक्ष दिले नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. येथील इतर लोकांनी ध्रुव तात्काळ बाहेर काढले आणि जवळील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र नाकातोंडात पाणी गेल्यामुळे उपचारापूर्वीच याचा मृत्यू झाला होता.

वसई विरार शहरात सुमारे ५० हुन अधिक खासगी आणि क्लब तरणतलाव आहेत. गेल्या वर्षात ५ हुन अधिक बुडून मृत्यूच्या घटना पडल्या असून, यातील बहुतेक घटनांमध्ये सुरक्षा यंत्रणेची कमतरता आढळली आहे.