Home ताज्या बातम्या वसई-विरार महानगरपालिकेची अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील एकूण १७ होर्डिंग...

वसई-विरार महानगरपालिकेची अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील एकूण १७ होर्डिंग काढले

27
0
वसई-विरार महानगरपालिकेची अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील एकूण १७ होर्डिंग काढले

वसई-विरार शहर महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचा हातोडा फिरवला आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि शहराती एकूण १७ होर्डिंग्स काढून टाकण्यात आले आहेत. तसेच मधुबन येथील विकासक निर्भयकुमार सिंग यांच्यावर अनधिकृत फलक लावल्याबद्दल आचोळे पोलीस ठाणेमध्ये मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या निर्देशानुसार पार पडली असून शहरातील अनधिकृत जाहिरातींवर लगाम घालण्याच्या मोहिमेला वेग मिळाला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सदर कारवाई मनपा आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या निर्देशनाखाली, उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. गेल्या ७ ते ८ माहिन्यांत महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्सविरुध्द मोठी मोहिम राबवली आहे.

  • एप्रिल-जून २०२५ मध्ये विरार पूर्व आणि नालासोपारा येथील ४५ होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आणि १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • जुलै-सप्टेंबर २०२५ मध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि वसई येथील ५० होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आणि १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • जुलै-ऑक्टोबर २०२५ मध्ये मधुबन, आचोळे आणि पेल्हार येथील ४० होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आणि १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मोहिमेत एकूण ५० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, दोषींना नोटिसाही पाठवल्या गेल्या आहेत. महानगरपालिकेने नोव्हेंबर २०२५ पर्यंत आणखी ५० होर्डिंग्स निष्कासित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.