Home गुन्हे जगत नालासोपारातील अमली पदार्थ कारखाना कारवाई प्रकरण

नालासोपारातील अमली पदार्थ कारखाना कारवाई प्रकरण

22
0
नालासोपारातील अमली पदार्थ कारखाना कारवाई प्रकरण

वरिष्ठ पोलीस निरिक्षक पाठोपाठ पोलीस अंमलदाराचे देखील निलंबन

अमली पदार्थांच्या कारखान्या विरुध्द चाललेल्या कारवाई प्रकरणात आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षकाच्या निलंबनानंतर आता पोलीस अंमलदारावरही निलंबनाची कुन्हाह कोसळली असून, या प्रकरणाची चौकशी वेग घेत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा पूर्वच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्हयांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई परिमंडळ सहा च्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकून ५० किलोहून अधिक कच्चा माल आणि तयार पदार्थ असा एकूण साडेतेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करून पाच जणांना अटक केली होती. हा कारखाना पेल्हार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच सुरु असताना पोलिसांना माहित नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र वनकोटी यांचे निलंबन केले होते. तर इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या होत्या.

या कारवाईनंतर सहायक पोलीस आयुक्त विरार विभाग यांनी सविस्तर चौकशी केली होती. या खातेनिहाय चौकशीमध्ये अंमलदार सुजय पाटील यांचे सदर व्यवसायातील व्यक्तीसोबतचे संशयास्पद व्यवहार निष्पन्न झाले त्यानंतर परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पाटील यांचे निलंबन केले. या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी सहायक पोलीस आयुक्त विरार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.