Home ठाणे - नवी मुंबई पनवेलमध्ये ५ सौरवृक्ष उभारले; स्वच्छ हवा व हरित ऊर्जेला मोठी चालना

पनवेलमध्ये ५ सौरवृक्ष उभारले; स्वच्छ हवा व हरित ऊर्जेला मोठी चालना

103
0
पनवेलमध्ये ५ सौरवृक्ष उभारले; स्वच्छ हवा व हरित ऊर्जेला मोठी चालना

पनवेल : ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक मिळालेल्या निधीतून पनवेल महानगरपालिकेने शहरात पाच अत्याधुनिक सौरवृक्ष (Solar Trees) उभारण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जनजागृतीही होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महापालिकेने शहरातील प्रमुख पाच उद्यानांमध्ये हे आकर्षक व तंत्रज्ञानसंपन्न सौरवृक्ष बसवले आहेत. प्रत्येक सौरवृक्ष सौरपॅनल्सद्वारे वीज निर्मिती करेल आणि रात्री एलईडी दिव्यांद्वारे प्रकाशमान होईल. यामुळे नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना सौरऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.

वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आता अधिक आक्रमक झाली आहे. शहरात धूळ नियंत्रणासाठी ४ फॉग कॅनन वाहने, वायू गुणवत्ता तपासणीसाठी एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन तर हवा शुद्ध करण्यासाठी आतापर्यंत ५ ठिकाणी एअर प्युरिफायर टॉवर बसवले आहेत. लवकरच आणखी ५ नवीन एअर प्युरिफायर बसवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली.

“पनवेल शहर आता खऱ्या अर्थाने ‘हरित व स्वच्छ’ होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे,” असे श्री. खारगे यांनी सांगितले.