ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी स्वयंसेवी संघटना ग्राहक सेवा संस्थेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणीचे आभियान चालविले आहे.
सदर संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर काम करीत असून त्यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढा दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे शेकडो सभासद असून ग्राहकांच्या हक्कांची जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी भव्य सदस्य नोंदणी चे आवाहन केले आहे.
या नोंदणी अभियानामध्ये सर्व समाजाप्रती सूज्ञ नागरिकांचा समावेश करण्यात येत असून ज्यांना या संस्थेमध्ये नोंदणी करावयाची आहे त्यांनी ७०२८५८६८७९ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव, वय, जन्म दिनांक, लिंग, आणि राहण्याचा पत्ता पाठवावा तसेच आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करता त्या बाबतची माहिती द्यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गितेंद्र मिर्लेकर यांनी केले आहे.









