होम ताज्या बातम्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विरारमध्ये ‘हरित क्रांती’; म्हाडा वसाहतीत २०० झाडांचे यशस्वी वृक्षारोपण

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विरारमध्ये ‘हरित क्रांती’; म्हाडा वसाहतीत २०० झाडांचे यशस्वी वृक्षारोपण

699
0
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विरारमध्ये ‘हरित क्रांती’; म्हाडा वसाहतीत २०० झाडांचे यशस्वी वृक्षारोपण

आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढते तापमान आणि पावसाचे विस्कळीत झालेले चक्र ही चिंतेची बाब बनली आहे. या संकटावर मात करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला सुरक्षित भविष्य देण्यासाठी विरार (पश्चिम) येथील म्हाडा बिल्डिंग नं. १२ च्या रहिवाशांनी एक आदर्श निर्माण केला आहे. अष्टविनायक सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकाराने आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने येथे २०० वृक्षांच्या लागवडीचा यशस्वी कार्यक्रम नुकताच पार पडला.

या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतला. याप्रसंगी स्थानिक रहिवासी प्रदीप पवार यांनी सांगितले की, “आज सिमेंटच्या जंगलात गार्डनचा अभाव जाणवतोय, परंतु केवळ तक्रार न करता आपण स्वतः घराबाहेर पडून वृक्षारोपण आणि संवर्धन केले पाहिजे. हा उपक्रम म्हणजे केवळ झाडे लावणे नसून, ती जगवण्याचा एक संकल्प आहे.”

या कार्यक्रमास उपस्थित शिक्षिकांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “निसर्ग वाचवणे ही आता केवळ हौस नसून ती काळाची गरज आहे. झाडे तोडण्याऐवजी आपण ती जपली, तरच ऑक्सिजन आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा भविष्यात उपलब्ध राहतील.” या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, इतर गृहनिर्माण संस्थांसाठी हा एक प्रेरणादायी वस्तुपाठ ठरला आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें