Home गुन्हे जगत नालासोपाऱ्यात लिव्ह-इन जोडप्याची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

नालासोपाऱ्यात लिव्ह-इन जोडप्याची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

83
0
नालासोपाऱ्यात लिव्ह-इन जोडप्याची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नालासोपारामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय जोडप्याने रविवारी मध्यरात्री चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. दीपक जोगडिया आणि कांचन सोळंकी अशी मृतांची नावे आहेत. दोघेही जागीच ठार झाले. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दीपक आणि कांचन हे नालासोपारा (पश्चिम) येथील हनुमान नगर परिसरातील साई महिमा इमारतीतील खोली क्रमांक ४०९ मध्ये २०२२ पासून एकत्र राहत होते. दीपक हा विवाहित असून त्याला १२ वर्षांचा मुलगा आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर तो कांचनसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. दोघेही मूळचे मुंबई (आर्थर रोड) परिसरातील असून सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.

रविवारी मध्यरात्री अचानक दोघांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या भागातील आत्महत्येच्या ताज्या घटना:

  • १५ ऑक्टोबर २०२५: नाळे गाव (नालासोपारा) येथे प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली.
  • १३ ऑक्टोबर २०२५: विरार येथे १९ वर्षीय तरुणीने ब्लॅकमेल व मारहाणीच्या नैराश्यात चौथ्या मजल्यावरून उडी घेतली.
  • ६ ऑक्टोबर २०२५: विरार (ओलांडा) येथे १८व्या मजल्यावरून दोन विद्यार्थ्यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली.