स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनाता पार्टीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः या निष्ठेने काम करणाऱ्या सुज्ञ नागरीकांना भाजपामध्ये सामील केले जात आहे; त्या अनुषंगाने विरार पश्चिम म्हाडा कॉलनी येथे राहणारे व व्यावसायिक, इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश कुर्ले यांची भारतीय जनता पार्टी विरार शहर पश्चिम मंडळाच्या क्रीडा प्रकोष्ट संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
स्थानिक पाताळीवरील खेळ आणि खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असून पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे विरार शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष विशाल राऊत यांनी त्यांची अधिकृतपणे निवड करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








