Home गुन्हे जगत पेणकर पाड्‌यात खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन; समाजसेविका श्वेता पाटील यांनी तडीपार गुंडाला...

पेणकर पाड्‌यात खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन; समाजसेविका श्वेता पाटील यांनी तडीपार गुंडाला रंगेहाथ पकडले

59
0
पेणकर पाड्‌यात खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन; समाजसेविका श्वेता पाटील यांनी तडीपार गुंडाला रंगेहाथ पकडले

मीरा-भाईंदर शहरातील पेणकर पाडा परिसरात पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा अड्डा उघडकीस आला. स्थानिक कुख्यात व तडीपार गुन्हेगार सोन्या हा इसम सार्वजनिक बाथरूममध्ये इंजेक्शन व ड्रग्स घेतानाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पाहताच समाजसेविका श्वेता पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सोन्याला रंगेहाथ पकडले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्याच्याकडून अंमली पदार्थांच्या अनेक पुड्या, वापरलेली व न वापरलेली इंजेक्शन्स आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य व आरोपी यांना श्वेता पाटील यांनी त्वरित मीरा रोड पोलीस ठाण्यात हस्तांतरित केले.

सोन्या हा इसम यापूर्वीच गंभीर गुन्ड्यांमुळे तडीपार झालेला असतानाही परिसरात बिनधास्त फिरत असल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. “वारंवार तक्रारी करूनही पोलिस कारवाई करत नाहीत, त्यामुळेच हे गुंड बेकायदेशीर धंदे मोकळेपणाने करतात,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“तडीपार गुन्हेगार परिसरात फिरत असेल तर पोलिसांचा दहशतव संपली आहे का? अंमली पदार्थांचा विळखा वाढतच चालला आहे. यापुढे कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू,” असा इशारा श्वेता पाटील यांनी पोलिसांना दिला.

पेणकर पाडा आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्सचा वापर आणि विक्री बोकाळली असून लहान मुले व तरुणही याच्या विळख्यात सापडत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांवर कठोर कारवाईचा दबाव वाढला आहे. मीरा रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सोन्याला अटक केली आहे.