वसई-विरार शहर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने सक्रिय भूमिका घेतली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा उपाययोजना, आरोग्यविषयक अडचणी, वेतन, भत्ते, सुविधा आणि इतर प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली.
आयोगाने महापालिका प्रशासनाला ७ दिवसांत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा साधने, आरोग्य शिबिरे, निवास व्यवस्था, वेळेवर वेतन आणि सरकारी योजनांचा लाभ सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आयोग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Bestseller #1
Bestseller #2








