Home ठाणे - नवी मुंबई धाडसी सुरक्षा रक्षकाची बहाद्दरी; तलावात उडी घेऊन तरुणीला वाचवले

धाडसी सुरक्षा रक्षकाची बहाद्दरी; तलावात उडी घेऊन तरुणीला वाचवले

239
0
धाडसी सुरक्षा रक्षकाची बहाद्दरी; तलावात उडी घेऊन तरुणीला वाचवले

नवी मुंबईतील तुर्भे गावात शनिवारी सकाळी २४ वर्षीय तरुणीने तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण महापालिकेच्या सुरक्षा रक्षक बाळासाहेब रोहम यांनी धाडस दाखवत तिचा जीव वाचवला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शनिवार दि २५ ऑक्टोबर रोजी सकाळी तलावाजवळ गस्त घालत असताना रोहम यांना एक तरुणी उडी घेताना दिसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारली. सोबत गणेश बंगेरा आणि शंकर पुजारी यांच्या मदतीने तरुणीला काठावर आणले.

रोहम यांनी त्वरित तुर्भे पोलिसांना माहिती दिली. सुरक्षा रक्षक कारंडे, पर्यवेक्षक मतकर आणि एपीएमसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.

मानसिक आजार आणि नैराश्यामुळे तरुणीने हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस सखोल तपास करत आहेत.

बाळासाहेब रोहम यांच्या धाडसी कृत्यामुळे एक मौल्यवान जीव वाचला. नवी मुंबई पालिकेने त्यांच्या कर्तव्यदक्षतेची दखल घेत प्रशंसा केली आहे.