Home ठाणे - नवी मुंबई दिव्यात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्लाः दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी

दिव्यात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्लाः दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी

110
0
दिव्यात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्लाः दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी

महानगरपालिका विरोधात नागरिकांचा संताप

ठाणे शहरातील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या क्रूर हल्ल्‌याने एका दोन वर्षांच्या चिमुकलीचे आयुष्य धोक्यात आले आहे. ही घटना शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या घटनेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हि घटना ठाणे येथील दिवा परिसरातील काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात घडली. पीडितेचे नाव वेदा विकास काजारे आहे. तिचे वय फक्त दोन वर्षे आहे. संध्याकाळी ती चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला, ज्यामुळे वेदाला अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले असले तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे, घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी मदत केली, पण हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की, चिमुकलीला वाचवण्यासाठी उशीर झाला.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्ल्यानंतरचा थरार दिसतो. घटनास्थळावरील गोंधळ आणि जखमी चिमुकलीची स्थिती स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे नागरिकांच्या रोषाला अधिक खतपाणी मिळाले आहे.

नागरिकांचा संताप आणि मागण्या

दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या परंतु पालिकेने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे. पालिकेच्या निष्क्रियतेमुळे भविष्यात आणखी मोठे अनर्थ होऊ शकतात, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत,

तात्काळ भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवावी.

  • कुत्र्यांवर योग्य प्रक्रिया (जसे की एनीमल बर्थ कंट्रोल आणि व्हॅक्सिनेशन) केली जावी.
  • परिसरातील सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजना, जसे की नियमित पेट्रोलिंग आणि जागरूकता मोहिमा, हाती घेतल्या जाव्यात.
  • या घटनेमुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाविरुद्ध रोष अधिक वाढला असून, नागरिकांनी महापालिका कार्यालयासमोर निषेध सभा घेण्याची धमकी दिली आहे.

राजकीय नेत्यांचा तीव्र निषेध

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेने ठोस पावले उचललेली नाहीत. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे.

पुढे मुंडे यांनी महापालिकेला इशारा देत म्हटले आहे की, जर महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची आणि त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडले जातील.”

त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले असून, अन्यथा पक्ष स्तरावर आंदोलन छेडण्याची धमकी दिली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी ठाणे महापालिकेने यापुढे ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. घटनेच्या तपशीलवार चौकशीसाठी महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा जनआंदोलन होईल.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे निर्देश

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर तात्काळ कारवाई करण्याचे महत्त्वाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत की, सर्व शाळा, रुग्णालये, सार्वजनिक संस्था आणि इतर गर्दीच्या ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवावे. ही कारवाई प्राणी कल्याण कायद्याच्या (Animal Welfare Act) चौकटीत करावी आणि कुत्र्यांना सुरक्षित आश्रयस्थळे (Shelters) पुरवावीत. हा आदेश ९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी झाला असून, तो देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य असते आणि प्राणी कल्याणाच्या नावाखाली मानवी जीविताला धोका होऊ देणार नाही.

आदेशाचे मुख्य मुद्दे

  • भटक्या कुत्र्यांना पकडणे, एनीमल बर्थ कंट्रोल (ABC) कार्यक्रमांतर्गत नसबंदी करणे आणि व्हेक्सिनेशन देणे बंधनकारक, त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे.
  • शाळा, रुग्णालये, मेट्रो स्टेशन, बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणे, येथे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना धोका असल्याने तात्काळ कारवाई,
  • प्रत्येक राज्याने भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयस्थळे उभारावीत. केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करावे आणि निधी उपलब्ध कराया.
  • प्रत्येक राज्याने भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयस्थळे उभारावीत. केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करावे आणि निधी उपलब्ध कराया.