Home डहाणू - पालघर मागासलेल्या तालुक्याची ओळख पुसली जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मागासलेल्या तालुक्याची ओळख पुसली जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

83
0
मागासलेल्या तालुक्याची ओळख पुसली जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ नोव्हेंबरला केला. विचारधारा आणि विकास या दोन अजेंड्‌यावर शिवसेना पुढे असल्याचे सांगून शिंदे यांनी मागासलेल्या पालघर जिल्ह‌याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने दिलेल्या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख केला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेतकरी, मच्छिमार आणि आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन शिंदे यांनी पालघरवासीयांना दिले. पालघर, डहाणू, जव्हार आणि वाडा या चार ठिकाणी झंझावाती प्रचार सभा घेतल्या असता लाडकी बहिणींसह स्थानिकांची अलोट गर्दी दिसून आली. पालघर नगरपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार उत्तम घरत हे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. पालघरमधील सभेत शिंदे म्हणाले, जिंदाल जेट्टी संदर्भात स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही. जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होणारे प्रकल्प मंजूर होणार नाहीत. लोकांवर वरवंटा फिरवून विकास करणार नाही. अडीच वर्षांत राज्याचा सर्वांगीण विकास केला असून, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अडथळे आले तरी ती सुरू केली आणि भविष्यातही चालू राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. ज्यांनी सत्तेसाठी विचारधारा सोडली आणि विकासाला विरोध केला, त्यांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे गटावर केली. लोकांना विकास हवा म्हणून पालघरमध्ये सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या बाजूने उभे राहिले, असेही ते म्हणाले.

डहाणू येथील सभेत शिवसेना नगराध्यक्ष उमेदवार राजेंद्र माच्छी आणि नगरसेवक उमेदवारांसाठी बोलताना शिंदे म्हणाले, डहाणूची मागास तालुका अशी ओळख लवकरच पुसली जाईल. विकासाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. मच्छिमारांच्या समस्या, किनारपनीवरील घरांचा प्रश्न, युनिफाइड डीसीपीआर आणि वनपद्र्‌यांचे मुद्दे सोडवले जातील. विकासापासून वंचित डहाणूला पहिल्या क्रमांकाचा तालुका बनवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जव्हारमधील सभेत नगराध्यक्ष उमेदवार पद्मा राजपूत आणि शिवसेना पॅनलसाठी बोलताना शिंदे म्हणाले, ठछत्रपती शिवरायांनी जात-पात, धर्म न बघता आदर्श राज्य घडवले. तोच आदर्श घेऊन शिवसेना पुढे चालली आहे. राज्यातील कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत. ठ जव्हारच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, मतदारांनी शिवसेनेला विजयी करावे, असे आवाहन केले.

वाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथे भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. वाडा नगराध्यक्ष पदासाठी हेमांगी पाटील लढत असून, शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये दोन मुस्लिम महिलांना उमेदवारी दिली आहे. या सभांमुळे महायुतीला (शिवसेना-भाजप) नवे बळ मिळाले असले तरी भाजपशी थेट लढती होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.