होम ताज्या बातम्या भाजपाची उलटी गिनती सुरु झाली आहे -विलास पोतनीस

भाजपाची उलटी गिनती सुरु झाली आहे -विलास पोतनीस

340
0
भाजपाची उलटी गिनती सुरु झाली आहे -विलास पोतनीस

शेकडो कार्यकत्यांनी हाती बांधले शिवबंधन

प्रतिनिधी : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूकीची तारीख आता केव्हाही येऊ शकते म्हणून जेथे चार आठवड्‌यांचा अधिवेशन असतो तेथे सत्ताधाऱ्यांनी फक्त एकाच आठवड्‌याचे अधिवेशन ठेवले आहे. त्यामुळे अधिवेशन संपताच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील पण भाजपने राज्य आणि देशात जी काही दादागिरी चालवली आहे ती आता संपत चालली आहे. भाजपाची आता उलटी गिनती सुरु झाली आहे असे रोखठोक मत पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार विलास पोतनीस व्यक्त केले.

विरार पश्चिम येथे सोमवार ८ डिसेंबर रोजी शिवसेना (उबाठा) चा भव्य पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळ्‌या पक्षातील शेकडो कार्यकत्यांनी शिवबंधन हाती बांधले. उप तालुकाप्रमुख नरेश वैद्य आणि शहर प्रमुख विवेक पवार यांनी या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे बोलताना पोतनीस म्हणाले की, भाजप साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता आपल्या हाती ठेवत आहे. यासाठी त्यांनी सर्व प्रशासकीय संस्थेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. म्हणून आता गाफील राहू नका, प्रत्येक ठिकाणाहून हजारोच्या संख्येने दुबार मतदार मिळत आहे त्यामुळे मतदार यादी महत्त्वाची आहे. मतदार यादी चेक करावे असे आवाहन त्यांनी कार्यकत्यांना केले आहे.

यावेळी जिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, विवेक पाटील, तालुका प्रमुख प्रथमेश राऊत, किरण फडणीस, तालुका सचिव संजय राऊत, शहर संघटक वंदना नांदविकर, विनायक नांदविकर, विनायक सामंत, शहर प्रमुख उदय जाधव यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.