होम वसई - विरार विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलचा दहावीच्या निकालात सुवर्णविजय : दोन्ही शाळांचा 100% निकाल;...

विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलचा दहावीच्या निकालात सुवर्णविजय : दोन्ही शाळांचा 100% निकाल; गुणवत्तेचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला!

59
0
विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलचा दहावीच्या निकालात सुवर्णविजय : दोन्ही शाळांचा 100% निकाल; गुणवत्तेचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला!

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल दिनांक 8 मे 2026 रोजी जाहीर झाला असून विरार येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या पूर्व व पश्चिम विभागातील दोन्ही शाळांनी घवघवीत यश संपादन करत 100 % निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. उत्कृष्ट निकालासह विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची भक्कम छाप उमटवत संस्थेची मान आणखी उंचावली आहे.

विरार (पश्चिम) येथील शाळेतून एकूण 358 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल 225 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले आहे. तसेच 114 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 18 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर 1 विद्यार्थी पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाला आहे.
या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे —

  1. सावंत वेदांत विष्णू – 96.60%
  2. कुंवर स्वरा संजय – 96%
  3. खरात सई सिद्धेश – 95.80%
  4. सावंत सार्थक भरत – 95.60%
  5. मजिठीया केवल राकेश – 95.20%
    याचबरोबर विरार (पूर्व) येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलने देखील 100% निकाल मिळवत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची प्रभावी साक्ष दिली आहे. या शाळेतून एकूण 273 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 167 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच 84 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 22 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
    या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे —
  6. पाटील समृद्धी सुमीत – 97.20%
  7. यादव हिमांशू कुलदीपसिंग – 96.20%
  8. भोसले कृतिक रंजित – 96.20%
  9. गावडे किरण एकनाथ – 95.80%
  10. गुंजल प्रज्वल सुजित – 95.80%
    नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून बौद्धिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विविध स्तरांवर उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी संस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न यंदाच्या उल्लेखनीय निकालातून अधोरेखित झाले आहेत.

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात संस्थेच्या ICSE शाखांच्या दोन्ही शाळांनीदेखील 100% निकालाची परंपरा कायम ठेवत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम छाप उमटवली होती. आता SSC विभागातील या दैदिप्यमान यशासाठी संस्थेचे विश्वस्त, शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कोई जवाब दें

कृपया अपनी टिप्पणी दर्ज करें!
कृपया अपना नाम यहाँ दर्ज करें