Home महाराष्ट्र स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अधिवेशन मोठ्या...

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अधिवेशन मोठ्या दिमाखात संपन्न !

107
0
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अधिवेशन मोठ्या दिमाखात संपन्न !

स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अधिवेशन हॉटेल निसर्ग येथील सभागृहात मोठ्या दिमाखात, थाटात, उत्साहात संपन्न झाला, अधिवेशनास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने नूतन पदाधिकाऱ्यांचा व सदस्याचा उत्साह शिगेला पोहचला होता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रामलाल चौकातील हॉटेल निसर्ग येथे संपन्न झालेल्या स्वराज्य जिल्हा अधिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्रीताई उत्पात होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, दैनिक सोलापूर तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, सुप्रसिद्ध दिवाणी वकील अॅड विश्वनाथ आळंगे, पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलीत करून जिल्हा अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केले तर प्रास्ताविक मनोगत जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केले. नवीन सदस्यांना देण्यात आलेल्या ओळख पत्राचे महत्व पटवून देत त्याचा गैरवापर टाळण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

भारतातील भ्रष्टाचार संपला तर मागे राहिलेला भारत जगजेत्ता होण्यास फार काळ लागणार नाही याकरिता माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर करा, आणि प्रत्येकाला माहिती मिळालीच पाहिजे असे उद्गार जेष्ठ वकील अॅड विश्वनाथ आळंगे यांनी काढले. हातात मोबाईल घेतलं म्हणजे योग्य पत्रकारिता होईल असे नाही, चुका टाळत पत्रकारिता करणे आवश्यक आहे, अनुभवावरून पत्रकारात प्रगल्भता येत असते, पत्रकारिता क्षेत्रात पदवीधारक लोक येणे आवश्यक आहे, पत्रकाराचे योगदान नाकारता येत नाही असे सडेतोड मनोगत दै. तरुण भारत चे संपादक प्रशांत माने यांनी मांडले. माहिती अधिकार कायद्यामुळे काही प्रमाणात काही अधिकाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे, तर प्रामाणिक अधिकारी या कायद्याला घाबरत नाही, पत्रकारिता हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे, प्रामाणिक कार्य करा, यश नक्की मिळतो असा सल्ला पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी दिला.

या प्रसंगी संस्थापक दिपक कांबळे, संस्थापक कमलेश शेवाळे, प्रदेशाध्यक्षा धनश्रीताई उत्पात यांनी नवीन कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.

सोलापूर जिल्हयात सर्वोच्च सदस्य संख्या वाढवून संस्थेच्या मागील पाच वर्षाच्या देशातील स्वराज्यच्या इतिहासात विक्रम केल्याबद्दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांना सर्वोत्तम संघटन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अहिल्यानगरचे जिल्हा उपाध्यक्ष अलीम शेख यांना ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी सोलापूर जिल्हयासह लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, मुंबई, बेळगांव सह अनेक जिल्हयातील २१० पेक्षा जास्त नूतन पदाधिकाऱ्यांना ओळख पत्र, नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच स्वराज्य सदस्य वाढीच्या स्पर्धेतील १२ विजेत्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वस्त उमेश काशीकर, संचालक प्रशांत निकम, संचालक श्रीकांत देशपांडे, पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, समन्वयक भारत नजन संचालक, प. म. उपाध्यक्ष कैलास कारंडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक सह कार्याध्यक्ष सुनील पंडित, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, सचिव सुधाकर शहाणे, सहसचिव दत्तगुरु वेदपाठक, सरचिटणीस दिपक कुरुलकर खजानक किशोर बेजगम, संतोष दीक्षित भंडार कवठेकर, संतोष पोतदार, गौरीशंकर सोनवणे यांचेसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याचे विश्वास रिसबूड व किशोर बेजगम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर शहाणे यांनी केले.